मुंबई

मुख्यमंत्री सहायता कक्षाची प्रक्रिया सुलभ

CD

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची प्रक्रिया सुलभ
रुग्णांना तीन ते आठ तासांत मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यातील गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळवताना होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री चिकित्सा आणि सहाय्यता कक्षाची मंजुरी प्रक्रिया तीन ते आठ तासांत पूर्ण हाेणार आहे.

नव्या प्रणालीअंतर्गत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, पेपरलेस आणि कॅशलेस असणार आहे. रुग्णांनी थेट नजीकच्या रुग्णालयात जाऊन नोंदणी करायची असून प्रत्येक रुग्णालयात नियुक्त ‘आरोग्यदूत’ रुग्णाची माहिती ऑनलाइन प्रणालीत अपलोड करणार आहेत. ही माहिती तत्काळ मंत्रालयातील वॉर रूमपर्यंत पोहोचणार असून तेथूनच संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे.
-----
उपचारांस नकार दिल्यास कारवाई
राज्य सरकारने सुमारे तीन हजार ८०० रुग्णालयांशी करार केला असून त्यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. एखाद्या रुग्णाचा उपचार करण्यास नकार दिल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. लवकरच एक मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे. त्याद्वारे रुग्णांना जवळच्या उपलब्ध रुग्णालयांची माहिती मिळू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT