भाईंदर थांबा चुकला; रेल्वे मोटरमन निलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : पश्चिम रेल्वेवरील विरार-दादर जलद लोकलने भाईंदर स्थानकावरील नियोजित थांबा चुकवल्याची घटना बुधवारी घडली. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शेकडो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधित मोटरमनला निलंबित केले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
विरारहून बुधवारी सकाळी १०.४४ वाजता सुटलेली १५ डब्यांची जलद लोकल ११.०१ वाजता भाईंदर स्थानकात थांबण्याचे वेळापत्रक होते; मात्र लोकल न थांबता पुढे गेल्याने फलाटावरील प्रवासी तसेच उतरायच्या तयारीत असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. कार्यालयीन वेळ असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. काही प्रवाशांनी पाठीमागून येणारी वातानुकूलित लोकल थांबवून त्यातून प्रवास केल्याचे सांगितले जाते.
या प्रकारानंतर पश्चिम रेल्वेने तातडीने चौकशी समिती नेमली. प्राथमिक तपासात मोटरमनची चूक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासात अधिक तपशील समोर येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.