मुंबई

‘एसआरएम-एथर’ एनर्जीचा करार

CD

‘एसआरएम-एथर’ एनर्जीचा करार
विद्यार्थ्यांना एथरमध्ये इंटर्नशिपची संधी
मुंबई, ता. १० : एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जी यांनी शुक्रवारी (ता. १०) एका सामंजस्य करारानुसार इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्राला थेट शैक्षणिक परिसंस्थेशी जोडणारा ‘एथर फोर्ज’ हा देशातील पहिलाच उपक्रम संस्थेमध्ये सुरू केला आहे.

एसआरएम-एथर यांच्या भागीदारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना एथर एनर्जीमध्ये सहा महिने ते एक वर्षापर्यंतच्या दीर्घकालीन इंटर्नशिपची संधी मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण करतानाच उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रगत कौशल्ये आत्मसात करता येतील. हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योगासाठी लागणारी कौशल्ये विकसित करण्यास मदत करेल, असे एथर एनर्जीचे टॅलेंट एक्विझिशन प्रमुख आरिफ अहमद शरीफ म्हणाले. या भागीदारीमुळे विद्यापीठातील इलेक्ट्रिक वाहन संशोधन पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या क्षेत्रात नवीन संशोधने समोर येतील, असे एसआरएम इन्स्टिट्यूटचे कुलसचिव डॉ. एस. पोन्नुसामी यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की. या सोहळ्याला दोन्ही संस्थांचे वरिष्ठ पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT