मुंबई

सोन्याची तस्करी करणाऱ्या २४ महिला अटकेत

CD

तस्करी करणाऱ्या २४ महिला अटकेत
३० किलो सोने जप्त

मुंबई, ता. १० ः महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) सोन्याची तस्करी करणाऱ्या तब्बल २४ महिलांना एकाच खेपेत अटक केली. या महिला आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीच्या वाहक आहेत. त्यांच्याकडून एकूण २९.३७ किलो सोने जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत ३७.७४ कोटी आहे.
एकाच कारवाईत इतक्या व्यक्ती आणि सोने हाती लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे डीआरआय प्रवक्त्याने सांगितले. ऑपरेशन धाबू ब्लीट्झ या सांकेतिक नावाने ही कारवाई करण्यात आली. काही महिला आफ्रिका खंडातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करणार आहेत, अशी नेमकी माहिती डीआरआयला आगाऊ मिळाली होती. त्याआधारे विमानतळावर आफ्रिका खंडातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. येणाऱ्या प्रवाशांची आधीच प्रोफाईल तपासणी सुरू करण्यात आली. ८ एप्रिलला केनियाची राजधानी नैरोबी येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या २४ महिलांना ताब्यात घेत झाडाझडती घेण्यात आली. तेव्हा त्यांनी शरीरात, सोबत आणलेल्या सामानात दडवून आणलेल्या सोन्याच्या लगडी आणि दागिने सापडले. झाडाझडतीदरम्यान या सर्व महिलांना सोने किंवा अमली पदार्थ तस्करीकरिता प्रशिक्षण देण्यात आले असावे, असा अंदाज कारवाईत सहभागी अधिकाऱ्यांनी नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT