मुंबई

उपवर्गीकरण समितीचा फास्ट ट्रॅक सुनावणी

CD

उपवर्गीकरण समितीची
फास्ट ट्रॅक सुनावणी

तीन सदस्यीय समिती स्थापन; अनेकांचा आक्षेप

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनुसूचित जातींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या प्रश्नाची फास्ट ट्रक सुनावणी करण्याची सरकारला घाई का, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातही अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची मागणी झाली. त्यानुसार निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. बदर यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समितीने शिफारशींसह अहवाल १६ मार्चला शासनास सादर केला. या समितीने किती लोकांची मते विचारात घेतली, कुठे सुनावण्या घेतल्या, याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. बदर अहवालाच्या अनुषंगाने राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव अशी तीन सदस्यीय समिती स्थापन केली.

बदर समितीचा अहवाल विधानसभेच्या पटलावर मांडला गेला असता किंवा सार्वजनिक केला असता तर त्यावर योग्य आक्षेप किंवा हरकती नोंदवणे शक्य झाले असते. तसेच उपवर्गीकरण समितीची स्थापना करताना संबंधित जातींनी प्रतिनिधित्व देण्याची आवश्यकता माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मांडली आहे. काँग्रेसच्या धनंजय शिंदे यांनी उपवर्गीकरणाचा आधार केवळ जुना सांख्यिकीय डेटा नसावा, तसेच आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे वर्गीकरण करण्यापूर्वी राज्यातील अनुसूचित जातींची अद्ययावत आणि वस्तुनिष्ठ जातीनिहाय गणना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

एवढी घाई का?
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १० एप्रिलला नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने १६ व १७ एप्रिलला यासंदर्भात सुनावणी ठेवली आहे. समिती अस्तित्वात आल्यावर आठवडाभराच्या आतच या सुनावण्या होणार आहेत. समितीसमोर आपली भूमिका किंवा मते मांडण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत नावे नोंदवण्यास सांगितले आहे. हा कालावधी अत्यंत कमी असल्याचे बडोले यांचे म्हणणे आहे.
...
आरक्षण ही केवळ प्रशासकीय योजना नसून ती सामाजिक न्यायाची व्यवस्था आहे. उपवर्गीकरणासारखे मोठे निर्णय अभ्यासाशिवाय किंवा पारदर्शकतेशिवाय घेतले, तर समाजात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.
- राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्यायमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT