नरहरी झिरवाळ प्रकरण : आरोपीची उच्च न्यायालयात धाव
मुंबई, ता. ११ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध करणाऱ्या आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
झिरवाळ हे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असलेला व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोपीवर आरोप आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर दक्षिण मुंबईच्या कफ परेड पोलिसांनी एका तृतीयपंथी व्यक्तीच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. तृतीतयपंथीने त्याच्या तक्रारीत आरोपीने कथित व्हिडिओमध्ये फेरफार करून आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आरोपीने त्याच्याविरुद्धचा गुन्हा रद्द करून संबंधित तृतीयपंथी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्यात आले असून, तृतीयपंथीविरोधात खंडणी, ब्लॅकमेल, गुन्हेगारी धमकी आणि कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आरोपीने याचिकेद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.