मुंबई

विक्रोळी स्टेशनवर लोकलचा थांबा चुकला!

CD

विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर शनिवारी (ता. ११) सायंकाळी बदलापूरकडे धावणाऱ्या जलद लोकलचा विक्रोळी स्थानकावरील नियोजित थांबा चुकल्याची घटना घडली. गाडी प्लॅटफॉर्म ओलांडून पुढे गेल्यानंतर गार्डने तत्काळ आपत्कालीन ब्रेक लावून ती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सायंकाळी सुमारे ५.५० वाजण्याच्या सुमारास बदलापूरला जाणारी जलद लोकल ‘डाउन थ्रू फास्ट लाइन’वरून जात असताना विक्रोळी स्थानकावर थांबली नाही. गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर चार डबे पुढे गेल्यानंतर परिस्थिती लक्षात येताच तत्काळ आपत्कालीन ब्रेकचा वापर करण्यात आला. या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेनंतर ही लोकल पुढील भांडुप स्थानकात नेण्यात आली. तेथे सुमारे आठ मिनिटे गाडी थांबवून आवश्यक तपासणीनंतर सायंकाळी ६ वाजता पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. या प्रकाराचा उपनगरी वाहतुकीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. मोटरमन आणि संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT