मुंबई

मुंबईत वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड; करीरोड येथे अडकली गाडी, प्रवाशांचा संताप

CD

वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड
करी रोड येथे अडकली गाडी, प्रवाशांचा संताप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर शनिवारी (ता. ११) रात्री वातानुकूलित लोकलमध्ये बिघाड झाल्याने मोठा गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणकडे जाणारी वातानुकूलित लोकल करी रोड स्थानकाजवळ अर्ध्या तासाहून अधिक वेळ थांबून राहिल्याने प्रवासी अडकून पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९.१६ वाजता सीएसएमटी येथून सुटलेली ही लोकल सुरुवातीपासूनच उशिराने धावत होती. दरम्यान, करी रोड परिसरात पोहोचताच तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी थांबवावी लागली. यादरम्यान लोकलमधील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेदरम्यान रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट घोषणा करण्यात न आल्याने प्रवाशांचा संताप व्यक्त होत आहे. काही प्रवाशांनी गाडीत अडकून पडल्यामुळे उष्णता आणि गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार केली. या घटनेमुळे कल्याणकडे जाणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल सेवा काही काळ विस्कळित झाली. या बिघाडाचा परिणाम सीएसएमटी ते कल्याण या मार्गावरील इतर लोकल सेवांवरही झाला असून, काही गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT