मुंबई

मान्सूनमध्ये दडलेला उष्णतेचा धोका; एक अब्ज भारतीयांना ''ओलसर उष्णतेचा'' विळखा

CD

मॉन्सूनमध्ये दडलेला उष्णतेचा धोका
एक अब्ज भारतीयांना ‘ओलसर उष्णतेचा’ विळखा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : भारतात मॉन्सून म्हणजे केवळ पावसाचा हंगाम नसून, त्यात आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा ‘ओलसर उष्णतेच्या लाटा’ (मॉईस्ट हीटवेव्ह) दडलेल्या असतात, असा खुलासा एका ताज्या संशोधनातून झाला आहे. ‘क्लायमेट डायनॅमिक्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, उत्तर भारतात अशा लाटांची शक्यता एका विशिष्ट हवामान नमुन्यामुळे १२५ टक्क्यांनी वाढते. विशेष म्हणजे, या जीवघेण्या संकटाचा अंदाज आता चार आठवडे आधीच लावता येणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथील डॉ. अक्षय देओरस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संशोधनात ‘वेट-बल्ब’ तापमानाचा वापर करण्यात आला आहे. केवळ हवेतील तापमान मोजण्यापेक्षा, यात उष्णता आणि आर्द्रता या दोन्ही घटकांचा विचार केला जातो. कोरड्या उष्णतेपेक्षा ही ओलसर उष्णता अधिक घातक असते, कारण हवेत जास्त आर्द्रता असल्याने शरीरातील घामाचे बाष्पीभवन होत नाही. परिणामी, शरीराचे अंतर्गत तापमान वाढून काही तासांतच उष्माघात किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

८४ वर्षांच्या (१९४० ते २०२३) आकडेवारीचा अभ्यास केल्यावर संशोधकांना असे आढळले की,​ उत्तर भारतात मॉन्सूनच्या सक्रिय टप्प्यात इंडो-गंगेटिक मैदानी प्रदेशातील कोट्यवधी लोकांना आर्द्रतेमुळे सर्वाधिक धोका निर्माण होतो. ​दक्षिण आणि पूर्व भारतात जेव्हा मॉन्सूनमध्ये खंड पडतो, तेव्हा हा धोका दक्षिण भारत आणि पूर्व किनारपट्टीकडे सरकतो. ढगांच्या अभावामुळे आर्द्र वातावरणात उष्णता अधिक साचते.
या संशोधनामुळे आरोग्य यंत्रणेला मोठी मदत मिळणार आहे. चार आठवडे आधी इशारा मिळाल्यास प्रशासनाला थंडावा केंद्रे सुरू करणे, शाळांच्या वेळा बदलणे आणि वीज पुरवठ्याचे नियोजन करणे सोपे होईल. विशेषतः शेतमजूर, बांधकाम कामगार आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी हा इशारा जीवनदान ठरू शकतो.

तयारीसाठी मोठी संधी
​या अभ्यासात युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, यूके मेट ऑफिस आणि पुण्यातील ‘आयआयटीएम’ मधील संशोधकांचाही सहभाग होता. ‘‘भारतात कोरड्या उष्णतेबद्दल जागरूकता आहे, पण ओलसर उष्णता छुप्या शत्रूप्रमाणे वार करते. आता वेळेपूर्वी अंदाज शक्य असल्याने तयारीसाठी मोठी संधी आहे,’’ असे डॉ. देओरस यांनी स्पष्ट केले.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT