मुंबई

मुंबईच्या पहिल्या क्लॉक टॉवरचा कायापालट

CD

मुंबईच्या पहिल्या क्लॉक टॉवरचा कायापालट
पालिकेकडून पुनर्बांधणीसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : भायखळ्यास्थित प्रसिद्ध जिजामाता उद्यान (राणीबाग) परिसरातील मुंबईतील सर्वात जुन्या ऐतिहासिक डेव्हिड ससून क्लॉक टॉवरला पुनरुज्जीवन मिळणार असून, मुंबई महापालिकेने त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार असून, येत्या दोन वर्षांच्या कालावधीत नूतनीकरणाचे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.
समाजसेवक डेव्हिड ससून यांच्या नावाने ओळखला जाणारा हा  जवळपास ६७ फूट उंचीचा क्लॉक टॉवर १८६६ मध्ये उभारण्यात आला. मुंबईत उभारण्यात आलेला पहिला क्लॉक टॉवर मानला जातो. प्रसिद्ध राजाबाई घड्याळ मनोऱ्याच्या बांधकामापूर्वी १२ वर्षे आधी हा क्‍लॉक टॉवर उभारला आहे. त्यामुळे या टॉवरला ऐतिहासिक महत्त्व असूनही अनेक दशकांपासून तो जीर्णावस्थेत आहे. या ऐतिहासिक वारशाचा पालिका व्यापक कायापालट करणार असून, दुरुस्तीबरोबरच नियमित देखभाल करण्यासाठी कंत्राटदारही नियुक्त केला जाणार आहे.
इतिहासकारांच्या माहितीनुसार, या मनोऱ्याच्या बांधकामाला १८६४ मध्ये सुरुवात झाली आणि १८६६ मध्ये तो अधिकृतपणे उभारण्यात आला. त्या वेळी या प्रकल्पाचा एकूण खर्च ५१,६५३ रुपये होता, त्यापैकी ३०,००० रुपये ससून यांनी दिले होते. १९२० च्या दशकात परळ रोड (सध्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड) रुंदीकरणाच्या कामाला हा मनोरा अडथळा ठरत होता, परंतु तो पाडण्याऐवजी जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण मनोरा जशाच्या तसा सध्याच्या ठिकाणी पुन्हा उभारण्यात आला. हे काम १९२६ मध्ये पूर्ण झाले आणि १० जानेवारी १९२७ ला मनोरा पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
साधारण २०० वर्षांपूर्वी भायखळा मुंबईचे पहिले उपनगर म्हणून उदयास आले. बगदादहून आलेले ज्यू व्यापारी डेव्हिड ससून यांच्या परिवाराने इकडे द माउंट नावाचा मोठा वाडा बांधला. त्या मालमत्तेतील ४८ एकरचा भूखंड त्यांनी मुंबई शहराला दिला. ज्यावर व्हिक्टोरिया गार्डन्स उर्फ राणीची बाग उभारण्यात आली. त्याच परिसरातील  प्रवेशद्वाराजवळ मुंबईतला पहिला आणि भारतातला दुसरा क्लॉक टॉवर आहे. शंभर वर्षांनंतर आता पुन्हा ही अनमोल वास्तू जतन करण्याबाबत स्तूत्य पाऊल उचलल्याचे  मुंबईचा वारशाचे अभ्यासक भरत गोठोसकर यांनी सांगितले.
आम्हाला यासंदर्भात काहीच माहिती नव्हती, परंतु पालिकेच्या या निर्णयामुळे या उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मुंबईतील आणखी एका ऐतिहासिक वास्तूची माहिती मिळणार आहे, याचे स्वागतच करायला हवे, असे केतकी देशपांडे यांनी सांगितले.

जनजागृतीची गरज
अनेक वारसा, ऐतिहासिक स्थळ, पाणपोई या मुंबईची ओळख आहे. त्या कालानुरूप पुसल्या जात आहेत, कोणालाही त्यांची फारशी माहितीही नाही. त्यामुळे त्याचे जतन आणि संवर्धन, त्याहीपेक्षा जनजागृती करणे आवश्यक असल्याचे संकेत पिटनाईक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

‘फार थोडे दिवस राहिलेत’ आशा भोसले यांचं भावूक वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणालेल्या...'आता माझं वय झालय'

Asha Bhosle Favorite Leader : आशा भोसलेंचा आवडता नेता कोण? भारदस्त आवाज असणारा नेता अत्यंत जिवलग मित्र...

Breaking News Live Update: शेतात लागलेल्या आगीत सालदाराचा संसार जळून खाक, तळवेल फाट्या जवळील घटना

SCROLL FOR NEXT