मुंबई

कारागृहातून न्यायालयालाऐवजी आरोपी गेला घरी

CD

कारागृहातून न्यायालयाऐवजी आरोपी गेला घरी
जबाबदार पोलिसाविरोधात गुन्हा नोंद
मुंबई, ता. १२ ः आर्थर रोड कारागृहात बंद असलेल्या कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेण्याऐवजी पश्चिम उपनगरातील त्याच्या घरी नेणे पोलिस शिपायाला चांगलेच महागात पडले. घरी जाताच संधी साधून आरोपीने धूम ठोकली. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पसार झालेला आरोपी आणि पोलिस शिपायाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आवेश अहमद एका गुन्ह्यात आर्थर रोड कारागृहात बंद होता. शुक्रवारी त्याची दिंडोशी येथील सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्याची कारागृहातून सुरक्षितपणे ने-आण करण्याची जबाबादारी सशस्त्र विभागात नियुक्त शिपाई गहिनीनाथ कांबळे यांच्यावर होती.
कांबळे यांनी सकाळी आर्थर रोड कारागृहातून आवेशचा ताबा घेतला आणि त्याला पोलिस वाहनातून दिंडोशी न्यायालयात आणले. मात्र, न्यायदालनात हजर करण्याऐवजी जोगेश्वरी येथील लोढा बेल एअर या सोसायटीतील निवासस्थानी नेले. आवेशने कुटुंबाची आणि वकिलांची भेट घेण्यासाठी कांबळे यांना प्रलोभन दाखवून फूस लावली होती. ठरलेल्या वेळेत पुन्हा न्यायालयात जाऊ आणि तेथून कारागृहात जाऊ, असे आश्वासन आवेशने दिले होते.
मात्र, घरी जाताच काही वेळाने संधी साधून आवेश पसार झाला. हे समजताच कांबळे यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीने आसपास आवेशचा शोध घेतला. संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब कळवली. आरोपी न्यायालयातून नव्हे तर निवासस्थानाहून पसार झाल्याचे समजताच वरिष्ठ पातळीवरून कांबळे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. विशेष म्हणजे कायदेशीर रखवालीतून आरोपीस पळून जाण्यास सहकार्य केले, हा आरोप ठेवत त्यांच्या विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

आरोपी शिपाई कांबळे यांना नोटीस बजावून सोडण्यात आले आहे, तर आवेशचा शोध सुरू आहे, असे ओशिवरा पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: राहुरीत अपक्ष उमेदवाराचा सायकलवर प्रचार; सुजय विखेंचीही घेतली भेट

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT