मुंबई

फाईन आर्टच्या सीईटीला मोठा प्रतिसाद, ९० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

CD

फाईन आर्टच्या सीईटीला मोठा प्रतिसाद
मुंबई, ता. १२ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एएसी-कला शिक्षण (फाईन आर्ट)मध्ये रेखा व रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, मातकाम, अंतर्गत गृहसजावट, धातुकला, उपयोजित कला या अभ्यासक्रमाची रविवारी, राज्यातील विविध जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला ९० टक्के विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.
आज झालेल्या एएसी-कला शिक्षण या सीईटी परीक्षेमध्ये २८७२ विद्यार्थ्यांपैकी २५८५ विद्यार्थी उपस्थित होते. या परीक्षेला एकूण २८७ विद्यार्थी अनुपस्थित होते, तर ही सीईटी प्रवेश परीक्षा सकाळच्या सत्रात सामान्य ज्ञान व डिझाइन प्रॅक्टिकल या दोन विषयांची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली, तर दुपारच्या सत्रात मेमरी ड्रॉइंग प्रॅक्टिकल व ऑब्जेक्ट ड्रॉइंग प्रॅक्टिकल या दोन विषयांची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली.
--
राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अमरावती, अकोला व नागपूर या १७ जिल्ह्यांतील २४ परीक्षा केंद्रावर ही सीईटी परीक्षा घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT