२० कोटींचा गांजा जप्त
मुंबई ः ओडिशातून महाराष्ट्रासाठी निघालेली गांजाची खेप केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) नागपूरमध्ये पकडली. या कारवाईत सुमारे २१० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हा साठा वाहून आणणारे आणि तो उतरवून घेणारे अशा चार व्यक्तींना अटक करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २० कोटी रुपये किंमत असलेला गांजाचा साठा उतरवून घेणारे दोघे नागपूरचे आहेत. ते हा साठा मुंबई, पुण्यासह राज्याच्या अन्य शहरांतील किरकोळ विक्रेत्यांमध्ये वितरित करणार होते. पश्चिम बंगालमधील नोंदणी असलेल्या आणि धातूचे पत्रे वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये गांजाचा साठा दडविण्यात आला होता, असे एनसीबी प्रवक्त्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.