मुंबई

वयोवृद्धांच्या शारीरिक, मानसिक छळाच्या दोन घटना

CD

वयोवृद्धांच्या छळाप्रकरणी
कुटुंबीयांविरोधात गुन्हा
मुंबई ः वयोवृद्धांचा कुटुंबीयांनीच शारीरिक, मानसिक छळ केल्याच्या दोन स्वतंत्र घटना शहरात घडल्या. पीडित वृद्धांच्या तक्रारीवरून विक्रोळी आणि वांद्रे पोलिसांनी कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पहिल्या घटनेत पतीच्या मृत्यूनंतर सासूचा छळ करणाऱ्या सुनेविरोधात विक्रोळी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सासूला उपाशी ठेवणे, मारहाण करणे, अपमान करणे, शिवीगाळ करणे आदी प्रकरे छळ सुनेने सुरू केला. याची कुणकुण लागताच धाकट्या मुलाने घरात सीसीटीव्ही लावून घेतले. मात्र, तो कामानिमित्त शहराबाहेर गेला असता सुनेने सासूला घराबाहेर काढले. त्यामुळे सासूला विवाहित मुलीचा आसरा घ्यावा लागला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीसही सुनेने घरात न घेता धमकावले.
वांद्रे येथील घटनेत एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या मालमत्तेतील एक निवासी गाळा नातवाला भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. ते घर नावावर होईपर्यंत सर्व सुरळीत होते. मात्र, घर नावावर होताच मुलगा, सून आणि नातवाने वृद्ध दाम्पत्याचा छळ सुरू केला. त्यामुळे या दाम्पत्याने गिफ्ट डीड रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांचा छळ आणखी वाढला. अखेर या दाम्पत्याने पोलिस तक्रार केली. त्या आधारे पोलिसांनी कुटुंबीयांविरोधात गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT