मुंबई

एमएमआरमधील सर्वात लांब कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला येणार वेग

CD

एमएमआरमधील सर्वात लांब कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रोला येणार वेग
तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाचे नव्याने पुनरावलोकन होणार; सल्लागाराची लवकरच नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सर्वात लांब असलेल्या तब्बल ४३ किलोमीटर लांबीच्या कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो प्रकल्पाला वेग येणार आहे. एमएमआरडीएने २०१९ मध्ये एका सल्लागार कंपनीकडून प्रकल्प अहवाल तयार करून घेतला होता. मात्र, तो व्यवहार्य न वाटल्याने एमएमआरडीएने सदरचा सल्लागार रद्द केला होता. दरम्यान, आता सदर मेट्रो मार्गिकेसाठीच्या तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यासाचे समीक्षण, प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन, सविस्तर प्रकल्प अहवाल, सविस्तर अंदाजपत्रक, निविदा दस्तऐवज तयार करण्यासाठी विविध सर्वेक्षणे, तसेच निविदा प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे.
कांजूरमार्ग-बदलापूर ही मेट्रो मार्गिका मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध मेट्रोंना आणि ट्रान्स हार्बरच्या लोकल मार्गाला जोडणारी एकमेव मेट्रो मार्गिका आहे. त्यामुळे मुंबईसह एमएमआरमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गिकेच्या कामावर आता एमएमआरडीएकडून पुन्हा नव्याने प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन केले जाणार आहे. तसेच यापूर्वी तयार केलेल्या या प्रकल्पाच्या अहवालाच्या समीक्षणासोबत अंदाजपत्रक, सर्वेक्षण आणि निविदा प्रक्रियेसह इतर कामांसाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून, त्याकरिता निविदा मागवल्या आहेत.
सुरुवातीला मुंबईपुरते मर्यादित असलेले मेट्रोचे जाळे आता ठाणे शहराच्या पुढे विस्तारत आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण ही मेट्रो-५ आणि कल्याण ते तळोजा ही मेट्रो-१२ चे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे मेट्रो-१४ कांजूरमार्ग-बदलापूर ही मेट्रो कल्याणच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे त्याला चालना देण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन केले जाणार आहे.

असा असेल मार्ग
- मार्गाची एकूण लांबी - ४३ किलोमीटर
- प्रस्तावित स्थानके - २४
- कांजूरमार्ग येथे मेट्रो-४ आणि ६ शी इंटरचेंज शक्य
- घणसोली येथे ट्रान्स हार्बर रेल्वेशी जोडणी शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT