मुंबई

शैक्षणिक वस्तू खरेदीत महापालिकेची कोंडी

CD

शैक्षणिक वस्तू खरेदीत महापालिकेची कोंडी
निविदांना प्रतिसाद कमी; काही वस्तूंसाठी तिसऱ्यांदा फेर-निविदा
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : महापालिकेच्या शाळा येत्या जून महिन्यात सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. मात्र, या वस्तू खरेदीच्या निविदा प्रक्रियेला पुरवठादारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. तांत्रिक कारणांमुळे आणि पुरेसे निविदाकार न आल्याने काही वस्तूंच्या खरेदीसाठी आता तिसऱ्यांदा फेर-निविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
​महापालिका शिक्षण विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, बूट, मोजे, छत्री आणि रेनकोट यांसारख्या वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. या प्रक्रियेत विलंब होऊ नये, यासाठी यंदा मध्यवर्ती खरेदी विभागाने फेब्रुवारी महिन्यापासूनच निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, गणवेश आणि रेनकोट यांसारख्या महत्त्वाच्या वस्तूंच्या खरेदीसाठी आवश्यक तितके निविदाकार पुढे आलेले नाहीत. नियमानुसार किमान तीन निविदा येणे आवश्यक असताना, काही प्रकरणांत केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला आहे.
​यासंदर्भात माहिती देताना शिक्षण विभागाच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी सांगितले की, काही वस्तूंसाठी निविदाकारांनी प्रतिसाद दिला आहे, तर काही ठिकाणी फक्त दोनच निविदाकार आले आहेत. या तांत्रिक कारणांमुळे प्रक्रिया पुन्हा राबवावी लागत आहे. काही निविदेला तीनऐवजी दोनच निविदाकार आल्याने फेर-निविदा मागवण्यात आल्या आहेत. यात वेळ जात असला तरी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत.
शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सर्व उपयोगी वस्तू मिळाव्यात, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे आणि लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन्य कायदेशीर पर्यायांचा विचार
​महापालिकेने वह्यांसाठी सुमारे २६.४२ कोटी, तर छत्र्यांसाठी ३.५१ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय गणवेश आणि बूट-मोज्यांसाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. वारंवार निविदा काढूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर महापालिका प्रशासन थेट खरेदी किंवा अन्य कायदेशीर पर्यायांचा विचार करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT