माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीचा कायापालट होणार
पालिकेकडून ५.९५ कोटींच्या निविदा प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळी स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्मशानभूमीच्या व्यापक पुनरुज्जीवन आणि दुरुस्ती कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालिकेच्या इमारत परिक्षण विभागाने सुमारे पाच कोटी ९५ लाखांच्या ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
या प्रकल्पांतर्गत वरळी स्मशानभूमीची व्यापक दुरुस्ती करण्यात येणार आहे. सुमारे ५,९५,०१,७०८.७२ रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, निविदा विक्री कालावधी १३ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत असणार आहे. बयाणा रक्कम ५,९६,००० रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता (इमारत परिक्षण) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कामासाठी इच्छुक कंत्राटदारांना महापालिकेच्या संकेतस्थळावरून निविदा अर्ज डाऊनलोड करता येतील. वरळी परिसरातील नागरिकांची सोय आणि स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेऊन पालिकेने प्राधान्याने हे काम हाती घेतले आहे. शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण केले जाणार आहे.
वरळी स्मशानभूमीची व्यापक दुरुस्ती (टप्पा १)
- एकूण अंदाजित खर्च : ५,९५,०१,७०८.७२ रुपये
- निविदा विक्री कालावधी : १३ एप्रिल २०२६ ते २२ एप्रिल २०२६
- बयाणा रक्कम : ५,९६,००० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.