मुंबई

वैद्यकीय शिक्षणात आता विद्यार्थ्यांचा आवाज उमटणार

CD

वैद्यकीय शिक्षणात आता विद्यार्थ्यांचा आवाज उमटणार
एनएमसीकडून ऐतिहासिक ‘फीडबॅक’ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : देशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी पाऊल उचलले आहे. आतापर्यंत महाविद्यालयांच्या कामकाजाचे मूल्यमापन प्रामुख्याने प्रशासन किंवा निरीक्षण पथकांद्वारे होत होते. मात्र, आता प्रत्यक्ष शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थ्यांनाही या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्यात येत आहे. ‘स्टुडंट फीडबॅक फॉर्म’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुभवांना आणि मतांना अधिकृत मान्यता मिळणार आहे, ज्यामुळे शिक्षणव्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुविधांच्या दृष्टीने विच्छेदन कक्ष, वाचनालयातील साधनसामग्री, वसतिगृहांची स्थिती तसेच ग्रामीण भागातील प्रशिक्षणाचे अनुभव यांचाही तपशीलवार आढावा घेतला जाईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सूचनांवर आधारित ठोस बदल घडवून आणण्यास मदत होईल आणि वैद्यकीय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि विद्यार्थी-केंद्रित होण्याचा मार्ग मोकळा होईल.

गोपनीयता जपली, भीती हटवली
महाविद्यालयातील त्रुटी किंवा समस्यांबाबत बोलताना विद्यार्थ्यांना अनेकदा कारवाईची भीती वाटते. ही बाब लक्षात घेऊन एनएमसीने हा फीडबॅक पूर्णपणे निनावी आणि गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे आपले मत मांडू शकतील. यामुळे प्रामाणिक अभिप्राय मिळून सुधारणा प्रक्रियेला गती मिळेल.

शिक्षणापलीकडेही लक्ष
हा फीडबॅक केवळ औपचारिक नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अनुभवावर आधारित आहे. यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्यापन पद्धती, प्रयोगशाळा सुविधा आणि क्लिनिकल प्रशिक्षणाचा दर्जा यांचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कॅम्पसमधील सुरक्षितता, रॅगिंगविरोधी उपाययोजना, मानसिक आरोग्य सहाय्य व्यवस्था आणि एकूण शैक्षणिक वातावरण यांचाही समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT