आंबेडकरी साहित्यात कॉमिक्सचा नवीन प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : अमर चित्र कथा, छोटा भीम आणि मराठीत ‘चांदोबा’ इत्यादी कॉमिक्स खूप परिचित आहेत. लहान मुलांना चांदोबाचे अंक वाचताना आपण वाचनालयात अनेकदा पाहिले आहे. या चिमुकल्यांना चित्ररूपी कथांतून महापुरुषांचा इतिहास चटकन कळतो. हा धागा पकडून सामाजिक कार्यकर्ते राहुल पगारे यांनी कॉमिक्सच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र सादर केले आहे. त्यांनी ‘बा भीमा’ आणि ‘क्रांतिज्योती सावित्री-भारताची आद्य स्त्री उद्धारक’ नावाचे एक सुंदर ग्राफिक नॉव्हेल प्रकाशित केले आहे.
राहुल पगारे यांच्या मते, चळवळ ही एक शाळा, एक इकोसिस्टम असते. आपले ज्ञान, समज, भावविश्व, समाजशीलता आणि आपल्या प्रतिक्रिया हे सर्व या इकोसिस्टमचा भाग आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कॉमिक प्रोजेक्ट बनवण्याची संकल्पना मनात आली होती. चळवळीचे दस्तावेज कॉमिक बुकच्या माध्यमातून मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे. ग्राफिक नॉव्हेल लिहिणे हे मोठ्या परिश्रमाचे काम आहे. त्यासाठी सखोल अभ्यास, संवाद लेखन, चित्रांची संकल्पना चित्रकारासमोर मांडणे, चित्रनिर्मिती आणि त्यास अनुरूप संवाद बसवणे ही सर्व प्रक्रिया कठीण असते. एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीसारखी सांगड घालावी लागते. यामध्ये लेखक, चित्रकार, संपादक इत्यादींचे मोठे योगदान असते. सावित्रीबाईंच्या शिक्षण क्षेत्रातील क्रांतीचा परिचय
ग्राफिक नॉव्हेलच्या कव्हरवरील चित्र आणि आत मांडलेला आशय हा कादंबरीसदृश असून, वैचारिक ग्रंथाला पूरक असा आहे.
क्रांतिज्योती सावित्री-भारताची आद्य स्त्री उद्धारक या ग्रंथाचे १५ मार्च २०२५ रोजी प्रकाशन झाल्यापासून आम्हाला विविध वयोगटांतील व सर्व स्तरांतील वाचकांच्या असंख्य प्रतिक्रिया मिळत आहेत, असे राहुल पगारे यांनी सांगितले.
मला कॉमिक बुक वाचायला खूप आवडते. आम्ही सावित्रीची वेशभूषा करून शाळेत भाग घेतला होता. आता सावित्रीबाई कशी होती लहानपणी हे वाचायला मिळत आहे. मी माझ्या मित्रांना रोज यातली एक स्टोरी वाचून दाखवते. सर्वांना सावित्रीबाईंची गोष्ट ऐकायला खूप आवडत आहे.
- श्रेया आराख (पुणे)
मला यातील सावित्री-जोतिबा यांची चित्रे खूप आवडली आणि ते लहान असताना कसे राहायचे बोलायचे हे वाचायला खूप आवडत आहे.
- सेपिअन जावळे (नवी मुंबई)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.