मुंबई

सहनशीलतेचा अंत पाहू नका!

CD

सहनशीलतेचा अंत पाहू नका!
बाबासाहेबांच्या स्मारकास होणाऱ्या विलंबावरून काँग्रेस संतप्त

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १३ : ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे केवळ एक बांधकाम नसून, ते कोट्यवधी लोकांच्या स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे; मात्र महायुती सरकारकडे ठोस धोरण आणि नियोजनाचा अभाव असल्याने या स्मारकाचे काम हेतुपुरस्सर रखडवले जात आहे. सरकारने आंबेडकरी अनुयायांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा सज्जड इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी आज दिला.
इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला होत असलेल्या विलंबावर जोरदार टीका करताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘‘हे सरकार फक्त अदाणी-अंबानींच्या हितासाठी काम करीत असून, देश विकण्याचा सपाटा लावला आहे. महापुरुषांचा वापर केवळ मतपेढीसाठी करणे ही भाजपची जुनी सवय आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे जलपूजन करून १० वर्षे झाली, तरी तिथे एक वीटही रचली गेली नाही. तीच अवस्था इंदू मिलमधील स्मारकाची झाली आहे. सरकार फक्त ‘तारीख पे तारीख’ देऊन जनतेची दिशाभूल करीत आहे.’’ राज्यात इतर मोठे प्रकल्प धडाधड मंजूर होतात. त्यांचे मार्केटिंग केले जाते; मग भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या वेळीच विलंब आणि मुदतवाढ का, असा सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला.
...
कारणे देणे बंद करा!
आता कारणे देणे बंद करा आणि ठोस कृती तसेच वेळबद्ध पद्धतीने स्मारकाचे काम पूर्ण करा, अशी मागणी करीत त्यांनी सरकारला इशारा दिला की स्मारकाच्या बाबतीत हलगर्जी जनता कदापि सहन करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT