मुंबई

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्याबाबत हालचाल

CD

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्याबाबत हालचाल
प्रवाशांच्या मागणीला रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद; ठोस निर्णयाअभावी नाराजी कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : कोकणाशी जोडणाऱ्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडीबाबत पुन्हा हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या दिवा स्थानकावरून सुटणारी ही गाडी पूर्वीप्रमाणे दादरहून चालवावी, या मागणीला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भात तांत्रिक बाबींची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मध्य व पश्चिम उपनगरातील प्रवाशांकडून या गाडीबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दिवा टर्मिनलवरून गाडी सुटत असल्याने मुंबईतील प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत असून, वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत. त्यामुळे ही गाडी दादरहून सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. रेल्वेमंत्र्यांच्या भूमिकेमुळे प्रवाशांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या, तरी तत्काळ निर्णय न घेतल्याने प्रवासी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. केवळ आश्वासनांवर विषय पुढे ढकलला जात असल्याची भावना काही संघटनांनी व्यक्त केली आहे.

मूळ मागणीकडे दुर्लक्ष
दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करणे अवघड नसल्याचे मत कोकणातील संघटनांनी व्यक्त केले आहे. अन्य मार्गांवरील गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध होत असताना, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना मुंबईबाहेरूनच सुरू ठेवण्याचे कारण स्पष्ट होत नाही, अशी टीका करण्यात येत आहे. काही पर्यायी मार्ग सुचवून मूळ मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कोकणातील प्रवाशांची गैरसोय
दिवा जंक्शन येथे योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध केल्यास गाड्यांचे नियोजन सुलभ होऊ शकते. इतर गाड्यांना दादर किंवा सीएसएमटी येथे स्थान मिळत असताना, कोकणातील प्रवाशांना मात्र गैरसोय का, हा प्रश्न आहे. प्रवाशांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT