मुंबई

वैतरणा अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात १२ कोटींची वाढ

CD

वैतरणा अक्षय ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात १२ कोटींची वाढ
भूसंपादनासाठी महापालिका देणार २२ कोटी रुपये
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १४ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर उभारण्यात येणाऱ्या अक्षय संकरित ऊर्जा प्रकल्पाच्या (जलविद्युत व तरंगता सौरऊर्जा) कामाला गती देण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या ऊर्जा वहन व्यवस्थेसाठी लागणाऱ्या भूसंपादन आणि मार्गाधिकार खर्चात १२ कोटी रुपयांची वाढ प्रस्तावित करण्यात आली असून, आता हा खर्च १० कोटींवरून २२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
या प्रकल्पासाठी विकसक मे. शापुरजी पालनजी आणि मे. महालक्ष्मी कोनाल ऊर्जा यांनी स्थापन केलेल्या मे. वैतरणा सोलर हायड्रो पावरजेन्को प्रा. लि. या कंपनीसोबत करार झाला आहे. यापूर्वी विकसकाकडे सुरक्षा ठेव म्हणून ५० कोटी रुपये ‘एस्क्रो’ खात्यात ठेवण्याची तरतूद होती. मात्र, आता याच ५० कोटींमधील १२ कोटी रुपयांचे समायोजन करून ती रक्कम भूसंपादन आणि वन विभागाच्या विविध परवानग्यांच्या खर्चासाठी वापरली जाणार आहे.
प्रकल्पाची वीजवाहिनी वनक्षेत्र आणि खासगी जमिनीतून जात आहे. वन विभागाकडून तत्त्वतः मान्यता मिळाली असली, तरी वन्यजीव मंडळाची परवानगी, झाडांची नुकसानभरपाई, पीकभरपाई आणि रेडीरेकनरमधील संभाव्य दरवाढ यामुळे खर्चात वाढ झाली आहे. आयआयटी बॉम्बेने या प्रकल्पाच्या अहवालाची तांत्रिक तपासणी केली असून, पहिल्या टप्प्यात ५.५ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
विविध वैधानिक परवानग्या आणि वनविभागाकडील तांत्रिक प्रक्रियेमुळे प्रकल्पाच्या वित्तीय परिनिश्चिती कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. मूळ २१० दिवसांचा कालावधी आता १,४३१ दिवसांपर्यंत (३० एप्रिल २०२६ पर्यंत) वाढवण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६९ (क) नुसार या सुधारित खर्चाला आणि मुदतवाढीला स्थायी समितीची मंजुरी मिळणे अपेक्षित असून लवकरच हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे.

​प्रकल्प : जलविद्युत आणि तरंगता सौरऊर्जा (हायब्रीड)
- ​सुधारित भूसंपादन खर्च : २२ कोटी रुपये
- ​बदल : ५० कोटींच्या सुरक्षा ठेवीतून १२ कोटींचा खर्च भागवणार.
​नवीन मुदत : ३० एप्रिल २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhim Jayanti: आमचा वर्षात एकच उत्सव... नियम का? भीम जयंतीत DJ बंदीवरून वरळीत नागरिक-पोलिस आमनेसामने; काय घडलं?

CSK vs KKR Live: ६, २८, ७, १५, ७! ऋतुराज गायकवाडचा खराब फॉर्म कायम; आयुष म्हात्रेला सलामीला पाठवण्याची मागणी

DA Hike 2026: डीए वाढीमुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल? तुमच्या खिशात किती पैसे येतील, वाचा संपूर्ण गणित

Pune Ambegaon Leopard Rescue: भराडी वखारवाडीत दीड वर्षांची बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद; चार महिन्यांत चौथा बिबट्या पकडला

Latest Marathi News Update: पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'च्या नाकेबंदीच्या मुद्द्यावर चर्चा

SCROLL FOR NEXT