मानखुर्दमध्ये भंगार गोदामाला भीषण आग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मानखुर्द येथील कुर्ला स्क्रॅप परिसरात आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही; मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्द, मंडाला येथील गोरेगाव-मुुलुंड लिंक रोडवर असलेल्या भंगार बाजार परिसरात सकाळी ८:१५च्या सुमारास आग लागली. आगीचे स्वरूप पाहून अग्निशमन दलाने सकाळी ८:१९ वाजता या आगीला ‘लेव्हल-१’ म्हणून घोषित केले. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, या ठिकाणी साठवून ठेवलेले तेलाचे कॅन, प्लॅस्टिक साहित्य, सुका कचरा आणि लाकडाचा मोठा साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट दूरवर दिसत होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पाच जम्बो टँकर, दोन वॉटर टँकर आणि एक क्विक रिस्पॉन्स व्हेईकल घटनास्थळी रवाना झाले. खबरदारीचा उपाय म्हणून १०८ रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली होती. अग्निशमन दलाला ११:०८ वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. या घटनेत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.