मुंबई

मुंबई पालिकेच्या अनुदानित शाळांतील शिक्षकांना मोठा दिलासा; सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार!

CD

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार!
मुंबई पालिकेच्या अनुदानित शाळांतील शिक्षकांना दिलासा
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रश्न अखेर सुटला आहे. जून-जुलै महिन्यापासून ही थकबाकी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचबरोबर प्रवास भत्त्याच्या मागणीलाही प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.
अनुदानित शाळांतील सुमारे २,५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सध्या ६०० रुपये प्रवास भत्ता मिळतो, तर पालिकेच्या स्वतःच्या शाळांतील शिक्षकांना २,७०० रुपये भत्ता मिळतो. हा दुजाभाव दूर करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून होत होती. यावर सकारात्मक तोडगा निघाला असून, महापालिकेने प्रवास भत्ता वाढवून देण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचे अधिकृत परिपत्रक पुढील महिन्यात प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती कामगार नेते प्रशांत पाटील यांनी दिली.
शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर आणि उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत ‘उत्कर्ष सभा’ या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला कामगार नेते प्रसाद लाड, बाबा कदम, भालचंद्र साळवी आणि प्रशांत पाटील उपस्थित होते. सातवा वेतन आयोग दोन वर्षांपूर्वी लागू होऊनही थकबाकी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र, या बैठकीत जून-जुलैपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
-----
​या निर्णयामुळे होणारे फायदे
​सातवा वेतन आयोग : प्रलंबित थकबाकीचा पहिला हप्ता जून-जुलैमध्ये मिळणार.
​प्रवास भत्ता : ६०० रुपयांवरून वाढवून मिळण्याचा मार्ग मोकळा; पुढील महिन्यात परिपत्रक येणार.
​लाभार्थी : अनुदानित प्राथमिक शाळांतील २,५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.
​महापालिका प्रशासनाने या प्रलंबित मागण्या मान्य केल्यामुळे शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. वैयक्तिक मानधन आणि इतर प्रशासकीय अडचणींवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
...........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT