मुंबई

मुंबईत अतिरिक्त १००० मेगावॉट वीज येणार

CD

मुंबईत अतिरिक्त १,००० मेगावॉट वीज येणार
अदाणी एनर्जीकडून कुडूस-आरे उच्चदाब वीजवहिनी कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्यभरातून मुंबई, ठाण्यासह परिसरासाठी १,००० मेगावॉट अतिरिक्त वीज घेऊ शकणार आहे. अदाणी एनर्जी सोल्यूशन्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने भिवंडी तालुक्यातील कुडूस–आरेदरम्यान ८० किलोमीटर लांबीची उच्चदाब वीजवहिनी उभारली असून, ती आज कार्यान्वित केली आहे. त्यामुळे मुंबईची विजेची मागणी वाढल्यानंतर किंवा मुंबई जवळील निर्मिती केंद्रात बिघाड झाल्यास राज्याच्या ग्रीडमधून अतिरिक्त वीज मुंबईत आणणे शक्य होणार आहे.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऑक्टोबर २०२०मध्ये मुंबईत अनेक भागांत ब्लॅक आऊट झाला होता. तेव्हा राज्यात अतिरिक्त वीज उपलब्ध असूनही केवळ उच्चदाब वीजवहिनीअभावी मुंबईत आणता आली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशी घटना घडल्यास राज्यभरातून अतिरिक्त वीज मुंबईत आणता यावी म्हणून आरे-कुडूसदरम्यान उच्चदाब वीजवहिनी उभारण्याचे निर्देश वीज आयोगाने दिले होते. त्यानुसार अदाणी एनर्जीने ३० किलोमीटर लांबीची ओव्हरहेड लाइन आणि ५० किमी लांबीची भूमिगत वीजवाहनी अशी एकूण ८० किलोमीटर लांबीची वीजवाहनी टाकली असून, ती कार्यान्वित केली आहे.
दरम्यान. आरे–कुदूस प्रेषण लाइन कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईला उच्च विश्वासार्हतेने मोठ्या प्रमाणावर नवीकरणीय ऊर्जा एकत्रित करण्यास सक्षम असा आधुनिक वीज मार्ग प्राप्त झाला असल्याचे अदाणी एनर्जी सोल्यूशनचे सीईओ कंदरप पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

ग्रीडची स्थिरता वाढणार
भारतामधील सर्वाधिक ऊर्जा वापरणाऱ्या शहरी समूहांपैकी एक असलेल्या एमएमआरसाठी हा प्रकल्प वीज वितरण पद्धतीत एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे. अतिरिक्त १,००० मेगावॉट क्षमतेमुळे शहरातील वीजनिर्मितीवरील अवलंबित्व कमी होईल, ग्रीडची स्थिरता वाढेल आणि मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होण्याचा धोका कमी होईल. या प्रकल्पात व्होल्टेज सोर्स कन्व्हर्टर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT