मुंबई

महापुरुषांच्या मिरवणुका काढण्यातून बाहेर पडावे

CD

महापुरुषांच्या मिरवणुका काढण्यातून बाहेर पडावे
राज ठाकरे यांचे मत

मुंबई, ता. १४ : छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांच्या नावाने जाती-धर्मात फूट पाडणे, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे यासारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे यांनी हे विचार मांडले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी दिलेले योगदान अतुलनीयच आहे; पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होत आहे, त्या वेळेस ‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन्स’सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही, तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवे इतकीच आस नव्हती, तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झाले पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकासदेखील झाला पाहिजे, ही त्यांची दृष्टी होती. बाबासाहेब हे त्या पिढीतील याबाबतीत अग्रणी नेते होते, असेही ते म्हणाले.
...
उणीव वारंवार भासते!
विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आताची सरकारे रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे, असेही ठाकरे यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT