मुंबई

डिजेविरोधातील कारवाईवरून रहिवाशांचे आंदोलन

CD

डीजेविरोधातील कारवाईवरून रहिवाशांचे आंदोलन
वरळीत चक्का जाम

मुंबई, ता. १४ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरळीच्या बीडीडी चाळीत डीजेविरोधातील पोलिस कारवाईमुळे नाराज रहिवाशांनी मंगळवारी संध्याकाळी तब्बल दोन तास आंदोलन केले. अखेरच्या टप्प्यात रहिवाशांनी चक्का जाम केला. रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी तात्पुरती परवानगी देत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरळीच्या जांबोरी मैदानात जत्रेचे, तर बीडीडी चाळीत मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डीजे लावण्यात आले होते; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजेवर बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर वरळी पोलिसांनी आयोजकांना डीजे बंद करण्यास सांगितले. त्यावरून रहिवासी आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या भूमिकेविरोधात रहिवासी रस्त्यावर आले. असंतोष दर्शविण्यासाठी रहिवाशांनी प्रथम बीडीडी चाळीतल्या इमारतींचा, जांबोरी मैदानातील जत्रेचा विद्युतपुरवठा बंद करीत काळोख केला. तरीही पोलिस भूमिकेवर ठाम असल्याचे लक्षात येताच रहिवासी रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोको केला. पोलिस सातत्याने आंदोलक रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर परिस्थिती आणखी चिघळण्याआधी पोलिसांनी तात्पुरती परवानगी दिली. त्यानंतर जमाव पांगला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT