मुंबई

कामगारांसाठी कबड्डी स्पर्धा २१ एप्रिलपासून मुंबईत

CD

कामगारांसाठी कबड्डी स्पर्धा २१ एप्रिलपासून मुंबईत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी २९ वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २१ ते २५ एप्रिलदरम्यान हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी २४ वी राज्‍यस्‍तरीय स्पर्धा पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण व महिला अशा तीन गटांत खेळवली जाईल. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल आहे. याबाबतचा तपशील www.public.mlwb.in वर किंवा मंडळाच्या कार्यालयांत उपलब्ध आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, मुंबईच्‍या महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार कालिदास कोळंबकरसह कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उद्‌घाटनाला हजेरी लावतील. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत कंपन्या-कारखान्यांच्या पुरुष संघांसह महिला संघांसाठी ही स्पर्धा खुली आहे. अंतिम विजेत्यांना प्रति गट ५० हजार, उपविजेत्यांना ३५ हजार, उपांत्य उपविजेत्यांना २० हजार रुपये बक्षिसांसह चषक, पदके व प्रमाणपत्रे. बाहेरगावच्या संघांना प्रतिदिन चार हजार निवास-भोजन भत्ता, मुंबई-ठाणे महिलासह संघांना एक हजार प्रवास भत्ता. पुरुष संघासाठी ३००, महिलांसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क. जास्तीत जास्त सहभागासाठी आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT