मुंबई महापालिका प्रशासनात फेरबदल
विसपुते, वळंजू यांची उपायुक्तपदी पदोन्नती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महापालिका प्रशासनात वरिष्ठ स्तरावर बुधवारी (ता. १५) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांना पदोन्नती देण्यात आली असून, अनेक विभागांच्या सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांची उपायुक्त (विशेष) आणि मनीष वळंजू यांची उपायुक्त (परिमंडळ-७) पदी पदोन्नती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून, प्रशासकीय निकड आणि रिक्त पदे भरण्याच्या दृष्टीने हे फेरबदल करण्यात आले आहेत. बदल्यांच्या नव्या आदेशानुसार, सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याकडे बाजार विभागासोबतच आता ‘सी’ विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. उपप्रमुख अभियंता असलेले जितेंद्र घोराडे यांची ‘बी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.
मनीष वळंजू यांच्या पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या ‘डी’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी योगेश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे अतिक्रमण निर्मूलन (शहर) विभागाचा अतिरिक्त कार्यभारही साेपवण्यात आला आहे. संतोष साळुंके यांची बदली जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी करण्यात आली आहे.
उपआयुक्तपदी बढती मिळालेल्या विसपुते आणि वळंजू यांची नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असून, त्याच्यासाठी एक वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी असेल. या पदोन्नत्या सध्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हे सर्व आदेश बुधवारपासून किंवा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून लागू होणार आहेत. या फेरबदलांमुळे पालिकेच्या प्रभाग समित्यांच्या कामकाजात अधिक गती येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.