मुंबई

एसटीला दररोज दीड काेटींचा तोटा

CD

एसटीला दररोज दीड काेटींचा तोटा
उत्पन्न ३१ कोटी ४० लाख; खर्च ३३ कोटी रुपये
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गत आर्थिक वर्षात महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाने चलनीय उत्पन्न ११ हजार ४७५ काेटी रुपये नाेंदवले असून, १२ हजार ०६६ काेटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे एसटीला ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये, तर खर्च ३३ कोटी रुपये आहे. त्यामुळे दररोज सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्यातील मागील आर्थिक वर्षात जालना, परभणी, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे आठ विभाग नफ्यात होते. उर्वरित २३ विभागांपैकी नाशिक, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या मोठ्या विभागांचा वाढता तोटा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
‘येत्या आर्थिक वर्षात वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करून उपलब्ध बस आणि मनुष्यबळाचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करणे अत्यावश्यक आहे. उर्वरित दीड ते दोन कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा भरून काढणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे,’ असे ते म्हणाले.

तोट्यातील विभागांची सखोल चौकशी करून त्यामागील कारणांची मीमांसा करावी व त्यावर ठोस उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. सातत्याने तोट्यात असलेल्या मोठ्या विभागांत सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरसारख्या मोठ्या विभागात दोन वर्षांपासून सातत्याने तोटा होत असून, तेथे अकार्यकारी विभाग नियंत्रक नेमण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
==
आर्थिक आणि वैधानिक अधिकार नसलेले अधिकारी प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना पर्यायी पदस्थापना देऊन सक्षम नेतृत्व देणे आवश्यक आहे. एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनिक शिस्त, संसाधनांचा प्रभावी वापर आणि जबाबदारी निश्चिती या तत्त्वांवर भर देत लवकरच व्यापक सुधारणा आराखडा राबविण्यात येणार आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT