मुंबई

गँगस्टर अबू सालेमला दणका

CD

गँगस्टर अबू सालेमला दणका
शिक्षा माफ करण्याचा दावा फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी कुख्यात गुंड  अबू सालेमने २५ वर्षांची शिक्षा माफ  करण्याची  आणि तुरुंगातून सुटका  करण्याची मागणी बुधवारी (ता. १५) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सालेमचे कारागृहातून बाहेर पडण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
सालेमने अद्याप २५ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा प्रत्यक्ष पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्याची याचिका अकाली असल्याचे निरीक्षण न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावताना नोंदवले. एकूण शिक्षा,  कच्चा कैदी म्हणून घालवलेला कालावधी आणि मिळवलेल्या माफीचा समावेश हा कार्यकाळ   २५ वर्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा  सालेमने याचिकेत केला होता. २४ डिसेंबर २०२४ पर्यंत  त्याने दोन प्रकरणांमध्ये शिक्षेची बेरीज करून एकूण २५ वर्षांहून अधिक तुरुंगवास भोगल्याचा दावा केला होता.  नोव्हेंबर २००५ ते सप्टेंबर २०१७ पर्यंतच्या खटल्यात त्याने शिक्षा भोगलेली ११ वर्षे  नऊ महिने आणि २६ दिवसांची गणना केली, तर २००६च्या टाडा प्रकरणात फेब्रुवारी २०१५ ते डिसेंबर २०२४ दरम्यान दोषी म्हणून नऊ वर्षे  १० महिने आणि चार दिवसांचा समावेश केला आहे. तसेच २००६ च्या प्रकरणात चांगल्या वर्तनासाठी त्याला तीन वर्षे १६ दिवसांची तुरुंगवासात माफी मिळाली. पोर्तुगालमध्ये खटल्यात घालवलेल्या वेळेसाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक महिन्याची सूट दिल्याचेही  सालेमने याचिकेत नमूद केले होते.
 
केंद्र सरकारचा होता विरोध
सालेम  २५ वर्षांच्या शिक्षेच्या मर्यादेपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुरुंगवासाचा कालावधी, कच्चा कैदी म्हणून घालवलेला वेळ आणि वेगवेगळ्या प्रकरणांमधील शिक्षेचा एकत्रित समावेश केल्याचे केंद्र सरकारने याचिकेला विरोध करताना स्पष्ट केले होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांतील शिक्षा कालावधी, तसेच नोव्हेंबर २०३० पर्यंत कमाल २५ वर्षांच्या शिक्षेचे पालन केले जाईल, असेही स्पष्ट केले. सालेमच्या संभाव्य सुटकेची तारीख ३१ जानेवारी २०४६ असल्याचेही प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.
---
सालेमवरील आरोप
मुंबई १९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणासह सालेमवर जानेवारी १९९३ मध्ये शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याचा साठा अभिनेता संजय दत्तच्या घरात पोहोचवण्याचा आरोप आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार सालेमने २५ वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यामुळे त्याची तुरुंगातून सुटका करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT