मुंबई

वांद्रे कॉन्सर्टचाही तपास

CD

वांद्रे कॉन्सर्टचाही तपास
नेस्को प्रकरणात संबंध उघड

मुंबई, ता. १५ ः वांद्रे परिसरात ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कॉन्सर्टमधील एक्स्टॅसीसह अन्य पार्टी ड्रग्जविक्री, सेवनाबाबत वनराई पोलिस तपास करणार आहेत. मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्तास दुजोरा दिला.
गोरेगावच्या नेस्को प्रदर्शन केंद्रात ११ एप्रिलला पार पडलेल्या ९×९ टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये मद्य आणि अमली पदार्थांच्या अतिसेवनाने अत्यवस्थ झालेल्या शीतल साळवी या तरुणीने आपल्या जबाबात ऑक्टोबर महिन्यात वांद्रे येथे पार पडलेल्या अशाच एका कार्यक्रमातही एक्स्टॅसीचे सेवन केल्याची माहिती उघड केली आहे. वांद्रे येथील कॉन्सर्टमध्ये एक्स्टॅसीसह अन्य कोणत्या अमली पदार्थांचे सेवन केले, ते कोणी पुरवले, त्याआधी अन्य कोणकोणत्या कॉन्सर्ट, अन्य सार्वजनिक कार्यक्रम किंवा खासगी पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन केले गेले, हा तपासाचा परीघ असेल. मात्र सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर असली तरी तिच्यावर सुरू असलेल्या उपचारांमुळे चौकशीत मर्यादा येत आहेत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
या तरुणीसोबत एक्स्टॅसीचे सेवन करणाऱ्या श्रेया राय आणि बिस्मातसिंह भसीन या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थिनी थोडक्यात बचावली. वनराई पोलिसांनी या प्रकरणात सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात आयोजक, अमली पदार्थ विक्रेता आणि दोन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मृत श्रेया व भसीन, बचावलेली साळवी आणि प्रतीक पांडे, रौनक खंडेलवाल हे आरोपी विद्यार्थी दक्षिण मुंबईतील नामांकित एमबीए महाविद्यालयात एकाच वर्गात शिकत होते.
...
संशयिताकडे चौकशी
विद्यार्थ्यांना एक्स्टॅसी पुरवणाऱ्या साखळीतील एका संशयिताला वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यास त्याला अटक केली जाईल, असे सांगण्यात आले.
...
१०पेक्षा अधिक गोळ्यांचे वितरण
आरोपी विद्यार्थी प्रतीक पांडे आणि कल्याण येथून अटक करण्यात आलेला अमली पदार्थ विक्रेता आनंद पटेल संपर्कात होते. मध्यस्थ मित्राच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि पांडेने पटेलकडून एक्स्टॅसी गोळ्या मागवण्यास सुरुवात केली. नेस्को घटनेच्या आधीही पांडेने पटेलमार्फत एक्स्टॅसी गोळ्या विकत घेतल्या होत्या. नेस्को कॉन्सर्टसाठी त्याने पटेलकरवी मागवलेल्या गोळ्यांपैकी दहांहून अधिक मित्रमैत्रिणीमध्ये वाटल्या, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
...
आर्थिक व्यवहारांची झाडाझडती
पटेलकरवी अमली पदार्थ मिळवल्यावर तो पांडे, खंडेलवाल यांनी मित्रमैत्रिणींना वाटला की विकला, ते स्वतःच्या महाविद्यालयासह दक्षिण मुंबईत स्वतंत्रपणे पार्टी ड्रग विकत होते का, याबाबत पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. त्यासाठी त्यांचे मोबाईल फोन, समाजमाध्यमांवरील हालचाली, बँक व्यवहार आदी काटेकोरपणे तपासले जात आहेत.
...
अन्य विद्यार्थ्यांची चौकशी
वनराई पोलिसांकडून श्रेया, शीतल, भसीन यांच्यासोबत कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्यांपैकी सुमारे १६ विद्यार्थ्यांची चौकशी करून जबाब नोंदवले आहेत. त्याद्वारे शीतलचा जबाब, आरोपींच्या चौकशीतून पुढे आलेला घटनाक्रम, माहिती जुळवून पाहिली जात आहे.
...
प्रभावकांच्या सहभागाबाबत...
नेस्को कॉन्सर्टमध्ये चर्चेतील समाजमाध्यम प्रभावक नशेत बीभत्स नृत्य, चाळे करतानाच्या चित्रफिती समाजमाध्यमांवरून सर्वदूर पसरल्या. त्यासोबत या कॉन्सर्टसाठी दीड हजारापासून तीन लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारण्यात आले, अशी माहिती पसरली. या माहितीची पोलिस खातरजमा करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT