मुंबई

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

CD

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी
-वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यात येत आहे. या अंतर्गत सुरू असलेल्या अलिबाग, नंदुरबार, गोंदिया, सातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या बांधकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.
या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी.
या बैठकीत प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ यांनी दिले.
रुग्णालयीन सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, विद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव संदीप ढाकणे उपस्थित होते. तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT