कॉन्सर्टमधील ड्रग्जसेवन रोखणे कठीण
मुंबई, ता. १५ ः तरुणाईला आकर्षित करणारे कॉन्सर्ट किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एक्स्टॅसी, एलएसडीसारख्या पार्टी ड्रग्जचे सेवन रोखणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदवली.
अशा कार्यक्रमांच्या आयोजनात पोलिसांची भूमिका परवानगीपुरती मर्यादित असते. संबंधित ठिकाणाचे क्षेत्रफळ, अपेक्षित गर्दी आणि सादर होणाऱ्या कार्यक्रमांचे तपशील जोखून ती दिली जाते. तुटपुंजा मनुष्यबळामुळे कार्यक्रमादरम्यान अनुचित घटना, गुन्हा घडू नये यासाठी योग्य त्या खबरदारीची जबाबदारी आयोजकांवर सोपवली जाते. पोलिस पथक प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित असल्यास थोडा फरक पडू शकेल; मात्र एक्स्टॅसी, एलएसडी किंवा कोकेन आदी वासविरहित पार्टी ड्रग आधीच सेवन करून कॉन्सर्ट किंवा अन्य कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कसे रोखणार, असा प्रश्न एका निवृत्त अधिकाऱ्याने उपस्थित केला. एक्स्टॅसीची इवलीशी गोळी किंवा टपाल तिकिटाइतका एलएसडी पेपर प्रवेशद्वारावरील पोलिस किंवा खासगी सुरक्षा रक्षकाची नजर चुकवू शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दुसरीकडे अलीकडच्या काळात बोकाळलेला पार्टी ड्रग्जसेवनाचा कल, त्यामुळे कमीपणाच्या भावनेतून सेवनाचे प्रमाण रोखणे कठीण आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. शहरात महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी डोम, नेस्को केंद्र, एमएमआरडीए मैदान, जियो वर्ल्ड येथे मुख्यत्वे असे कॉन्सर्ट होतात. त्याला पाच ते ५० हजार तरुण उपस्थिती लावतात. त्या प्रत्येकाची झाडाझडती घेणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया अन्य अधिकाऱ्याने नोंदवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.