मुंबई

मुंबईतील विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

CD

मुंबईतील विकासकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
आयुक्त अश्विनी भिडे यांचे कडक निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज (ता. १६) मुंबईतील विविध महत्त्वाच्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाचे काम १५ जुलैपर्यंत, तर सर्व रस्ते काँक्रीटीकरणाची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुले करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ​शीव पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा सायन रेल्वे उड्डाणपूल हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. रेल्वे विभागाकडून गर्डर लॉन्चिंगला विलंब झाल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. पुलाच्या कामातील तांत्रिक अडथळे दूर करून, रेल्वे व महापालिका विभागाने समन्वय ठेवावा आणि १५ जुलैपर्यंत पुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, असे त्यांनी बजावले.
​पावसाळ्यात मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी आयुक्तांनी ३० एप्रिलनंतर नवीन रस्ते खोदकाम करण्यास बंदी घातली आहे. सुरू असलेली काँक्रीट ओतण्याची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करावीत आणि ३१ मेपर्यंत सर्व रस्ते वाहतुकीस सज्ज करावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. या वेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेशी तडजोड न करण्याच्या सूचनाही दिल्या.
पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या धारावी येथील ४१८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्राचीही आयुक्तांनी पाहणी केली. या प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून, जुलै २०२७ पर्यंत हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे केंद्र आधुनिक एसबीआर तंत्रज्ञानावर आधारित असून, अत्यंत कमी जागेत उभारले जात आहे.

पारदर्शकता राखण्याचे आदेश
​चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाळी पाणी साचू नये, यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली. रेल्वे हद्दीतील जलसाठवण टाकी आणि हायवे सोसायटी परिसरातील पाण्याचा उपसा अधिक कार्यक्षमतेने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच नाल्यातील गाळ काढण्याच्या कामात पारदर्शकता राखण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

SCROLL FOR NEXT