मुंबई

गणवेश, साहित्य खरेदीबाबत सक्ती नको

CD

गणवेश, साहित्य खरेदीबाबत सक्ती नको
शिक्षण संचालकांचे आदेश; शाळांना लगाम

मुंबई, ता. १६ ः राज्यातील काही खासगी आणि अनुदानित शाळांकडून पालकांना आपल्या ठरलेल्या विशिष्ट दुकानांमधूनच गणवेश आणि इतर सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करतात. अशा सक्ती करणाऱ्या संस्था आणि शाळांविरोधात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी समोर आल्यास शालेय शिक्षण विभागाकडून थेट कारवाई केली जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी आज राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्यासंदर्भात कोणत्याही शाळेने सक्ती केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पालकांवर खासगी व्यवस्थापनाच्या संदर्भाने गुणवत्ता नसलेल्या प्रकाशकांची पुस्तके लादली जात आहेत. त्यातून संस्थाचालक आणि प्रकाशकांचे हजारो कोटींचे व्यवहार मागील काही वर्षांत राजरोसपणे सुरू आहेत. याचा सर्वांत मोठा फटका पालकांच्या खिशाला बसला असल्याने शालेय शिक्षण विभागाने आता प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणत्याही खासगी प्रकाशकाची पुस्तके वापरू नयेत, केवळ राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई, एलसीएसई मंडळाच्या शाळांनी एनसीईआरटी, एससीईआरटी तसेच बालभारतीची पाठ्यपुस्तके वापरावीत. अन्य मंडळांच्या शाळांनी त्या त्या मंडळांनी प्रमाणित केलेली पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करू नये, तसेच त्यांच्यावर सक्ती करू नये, असे आदेशात म्हटले आहे.
...
कारवाईसाठी असे आहेत मुद्दे
- विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी.
- याबाबतच्या तक्रारींसाठी आपल्या कार्यालयाचा ई-मेल आयडी प्रसिद्ध करावा. तसेच विषयाच्या अनुषंगाने नोडल अधिकारी यांची नेमणूक करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT