मुंबई

महापालिका सभागृहात रणकंदन

CD

महापालिका सभागृहात रणकंदन
शिवसेनाप्रमुखांवरील कथित वक्तव्यावरून वाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ ः मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सभागृहात अवमान केल्याचा आरोप करीत त्यांनी माफी मागावी, असा आग्रह धरीत त्यांच्या वक्तव्याचा सत्ताधारी महायुतीच्या सदस्यांनी निषेध केला. मात्र, विरोधी पक्षनेत्या पेडणेकर यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावरून सभागृहात रणकंदन झाले. अखेर मोठा गदारोळ झाल्याने महापौरांनी सभागृह तहकूब केले.
किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेत पेडणेकर यांनी माफी मागण्याची मागणी लावून धरली; मात्र पेडणेकर यांनी, आपण तसे चुकीचे वक्तव्य केलेच नसल्याचे ठामपणे सांगत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. घोषणाबाजी झाली. विरोधक आणि सत्ताधारी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी, पेडणेकर यांनी चुकीच्या वक्तव्याबाबत माफी मागण्याची विनंतीदेखील केली; मात्र त्यानंतरही पेडणेकर या त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिंदे यांनी त्याबाबत निषेध व्यक्त करीत झटपट सभा तहकुबी मांडली. त्यावर महापौरांनी सभा तहकूब केली. पालिकेच्या सभागृहात आज अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. मात्र, तत्पूर्वी विशाखा राऊत यांनी, महापौर रितू तावडे यांना आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगी दुसऱ्या रांगेत बसविण्यात आल्याने त्यांचा अपमान झाल्याचे सांगत निषेध व्यक्त केला. सभागृह नेते गणेश खणकर यांनी राऊत यांच्या मुद्द्याला समर्थन दिले. तसेच नवीन सदस्यांना सभागृहात कसे वागावे, बोलावे आणि महापौरांचा सन्मान राखणे याबाबत प्रशिक्षण दिले पाहिजे, अशी सूचना केली. त्यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी खणकर यांना उत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही विचार विकत घेतले जात आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर सभागृहनेते खणकर यांनी आक्षेप घेतला आणि माफी मागावी अशी मागणी केली.
...
सभागृह तहकूब
किशोरी पेडणेकर या काही कामासाठी सभागृहाच्या बाहेर जाण्यास निघाल्या. त्या वेळी महापौर तावडे यांनी आणि भाजप सदस्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. त्यावरून गदारोळ झाल्याने सभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. घोषणा आणि प्रतिघोषणांनी सभागृह दणाणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT