मुंबई

मुंबई उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत

CD

मुंबई उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतोय ‘आधार’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १७ : मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून ८६९ गरजू रुग्णांना सुमारे आठ कोटी १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत अशा रुग्णांना दिली जाते, ज्यांना इतर शासकीय योजनांतून सहाय्य मिळाले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे अर्ज प्रक्रिया पेपरलेस करण्यात आली असून, मदत लवकर मिळू लागली आहे. तसेच विविध रुग्णालये, संस्था आणि दाते यांच्या सहकार्याने निधी अधिक प्रभावीपणे वापरला जात आहे.
या योजनेत कर्करोग, हृदयविकार, किडनी, अपघात यांसारख्या २० गंभीर आजारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. बालकांच्या कर्करोग उपचारासाठी बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरसोबत करार करण्यात आला असून, त्यामुळे उपचारासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरात ४० हजारांहून अधिक रुग्णांना ३३३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक आधार मिळत असून, त्यांचे उपचार सुलभ होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

IPL 2026 News: मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर CSK च्या ताफ्यात! काल वानखेडेवर होता, आज मोठा ट्विस्ट; रोहितचा आशीर्वाद घेतला अन्...

Latest Marathi News Live Update : भारताची निवडणूक रचना बदलण्याचा एक प्रयत्न हाणून पाडला-राहुल गांधी

Lucky Plants for Home : कुंडीत लावा 'ही' 2 युनिक झाडे! घराकडे खेचतात पैसा; उघडतात यशाची दारे, पण रोपटं लावताना करू नका एक चूक

SCROLL FOR NEXT