मुंबई

‘विसंगत’ मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी

CD

‘विसंगत’ मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी
सासऱ्याने दिले जावयाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीचे मानले जाणारे ‘एबीओ विसंगत’ मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीपणे पार पडले. यामुळे ३९ वर्षीय रुग्णाला नवे जीवन मिळाले आहे. एका खासगी रुग्णालयात हे प्रत्यारोपण झाले.
हा रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असून, शारीरिकदृष्ट्या कमकुवत होता. कुटुंबात योग्य दाता उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. अशा वेळी रुग्णाचे ५५ वर्षीय सासरे पुढे आले आणि रक्तगट भिन्न असूनही त्यांनी मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. रुग्णाचा रक्तगट बी पॉझिटिव्ह असून, दात्याचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्याने हे ‘एबीओ विसंगत प्रत्यारोपण’ होते. अशा शस्त्रक्रियांमध्ये संसर्ग व प्रतिकारशक्तीशी संबंधित गुंतागुंतीचा धोका अधिक असतो. या शस्त्रक्रिया पथकात मूत्रविकार व प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. जयेश डाबालिया, डॉ. प्रवीण व्यवहारे, डॉ. प्रकाश तेजवानी आणि डॉ. आशुतोष बागेल यांचा समावेश होता.
शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णावर विशेष ‘डिसेन्सिटायझेशन प्रोटोकॉल’ राबवून प्रतिपिंडांची पातळी कमी करण्यात आली. त्यानंतर अत्यंत काटेकोर नियोजन, संसर्ग नियंत्रण आणि तज्ज्ञ देखरेखीखाली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
नेफ्रोलॉजिस्ट व मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. पुनीत भुवनिया यांनी सांगितले की, ‘‘एबीओ विसंगत प्रत्यारोपण अत्यंत आव्हानात्मक असते. अशा परिस्थितीत सासऱ्यांनी पुढे येऊन जावयाचे प्राण वाचवणे ही अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. आधुनिक उपचारपद्धती व बहुविभागीय सहकार्यामुळे हे यश शक्य झाले.’’
...
दोघांची प्रकृती स्थिर
शस्त्रक्रियेनंतर सुमारे एक महिन्यात रुग्ण आणि दाता दोघांची प्रकृती स्थिर असून, रुग्णाला डायलिसिसमधून मुक्त करण्यात आले आहे. त्याचे वजन वाढू लागले असून, आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT