मुंबई

सीएसएमटीत ‘जागतिक वारसा दिन’ उत्साहात; हेरिटेज वॉकमधून रेल्वेच्या वैभवाचा अनुभव

CD

सीएसएमटीत ‘जागतिक वारसा दिन’ उत्साहात

वारसा सहलमधून रेल्वेच्या वैभवाचा अनुभव

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १८ : दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेले सीएसएमटी शुक्रवारी एका वेगळ्याच रंगात पाहायला मिळाले. ‘जागतिक वारसा दिना’निमित्त मध्य रेल्वेकडून आयोजित वारसा सहल, प्रदर्शनी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून या ऐतिहासिक स्थानकाचा समृद्ध आणि वैभवशाली वारसा नागरिकांसमोर उलगडण्यात आला.

अपर महाप्रबंधक प्रतीक गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी नागरिकांना सीएसएमटीच्या स्थापत्य वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली. रेल्वे अधिकारी, कर्मचारी, सिव्हिल डिफेन्स सदस्य, स्काऊट्स गाइड्स तसेच नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले. प्लॅटफॉर्म १४ व १५ दरम्यान उभारलेल्या ‘हेरिटेज एली’तील प्रदर्शनीत सीएसएमटीच्या वास्तुकलेवरील माहितीफलक, रेल्वे स्थानके व पूल यांवरील माहिती तसेच नेरल-माथेरान लाइट रेल्वेवरील लघुपट सादर करण्यात आले. जुन्या इंजिन व डब्यांची मॉडेल्स आणि स्क्रॅपपासून साकारलेली महात्मा गांधींची प्रतिमा विशेष आकर्षण ठरली. याशिवाय हेरिटेज म्युझियम आणि ‘स्टार चेंबर’चे दर्शनही घडविण्यात आले.

याप्रसंगी उपस्थितांना रेल्वे वारसा जतन करण्याची शपथ देण्यात आली. तसेच या दिनानिमित्त सीएसएमटीच्या ऐतिहासिक इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली. दरम्यान, मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्येही यानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
.........
ग्राफिक्स -
मध्य रेल्वेचा वारसा

१. सीएसएमटी : इंडो-गॉथिक शैलीतील भव्य वास्तू; बांधकाम १८७८ ते १८८८ दरम्यान
......
२. भायखळा स्थानक : १८५३ मधील पहिल्या रेल्वे प्रवासाचा भाग; सुमारे १७३ वर्षांचा इतिहास
....
३. नेरळ-माथेरान लाइट रेल्वे : १९०७ मध्ये सुरू; निसर्गरम्य डोंगररांगांतून धावणारी वारसा लाइन
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic Jam : खंबाटकी घाटात ST बस ठप्प; विकेंडला पुणे-सातारा महामार्गावर भीषण ट्रॅफिक कोंडी!

अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सने घरात घुसून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवले; डेव्हिड मिलरने ३ चेंडूंत फिरवली मॅच, गुणतालिकेत बदल

Phulambri News : शेतकऱ्यांच्या शेतातच मृत्यूचा सापळा..! लोंबकाळणाऱ्या वीजतारांनी वाढवला धोका; महावितरण विभागाचे दुर्लक्ष

Doordarshan Veteran Passes Away: दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर मोहोर उमटविणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक अरुण काकतकर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT