मुंबई

थांबा एसटीचा की खाजगी गाड्यांचा?

CD

थांबा एसटीचा की खासगी गाड्यांचा?
खासगी बस, शेअरिंग वाहनांचे अतिक्रमण सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ऑटो-टॅक्सी किंवा खासगी वाहनचालक बसस्थानक किंवा प्रवासी थांब्यावर बस आणि शेअरिंग वाहनांचे अतिक्रमण केले आहे. दादर आणि मैत्री पार्क बस स्थानकात हे चित्र मोठ्या प्रमाणात दिसते.

राज्यातील वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर निष्क्रिय व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे बस स्थानकात एसटीच्या गाड्यांची वर्दळ वाढत असून प्रवाशांची संख्याही वाढत आहे. स्थानक परिसरात बेकायदा आणि मनमानी पद्धतीने पार्किंग केलेली खासगी चारचाकी व दुचाकी वाहने स्थानकात ये-जा करणाऱ्या एसटी गाड्या व प्रवाशांची वाट अडवत आहेत.

बस स्थानकाच्या एसटी बस येण्या-जाणाच्या ठिकाणी खासगी वाहने उभी केली जात असून एसटीच्या गाड्यांना अडचण निर्माण होते. तसेच एसटी बस पकडताना प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकांनी सूचना देऊनही खासगी वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करून बेशिस्तपणे स्थानक परिसरात वाहने उभी करतात.
==
काय आहे नियम?
बस स्थानक परिसराच्या १०० मीटर अंतराच्या आत खासगी वाहने उभी करण्यास मनाई आहे. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे आवश्यक आहे.
---
मुंबईत वाहतूक कोंडी
दादर आणि मैत्री पार्क ही दोन्ही महत्त्वाची बस स्थानके आहेत. या भागात ऐन गर्दीच्या वेळी खासगी वाहने असल्याने बस जाण्यास जागा मिळत नाही. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
-----------
दादर येथे मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी राहतात. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम होतो. आम्ही दादर व मैत्री पार्क येथे कर्मचारी नेमले आहेत. सर्व अवैध वाहतूक बस, कार यांचीही नोंद ठेवत आहेत. आरटीओ अधिकारी आल्यावर वाहने हटवली जातात; पण ते गेल्यानंतर पुन्हा येतात.
- नितीन चव्हाण, आगारप्रमुख, परळ
==
खासगी वाहतूकदार सर्व नियम पायदळी तुडवून लूटमार करीत आहेत. एसटी आगार, स्थानकाच्या जवळच्या परिसरात २०० मीटरचा नियम मोडून आपली बुकिंग कार्यालय सुरू केली आहेत. शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा खासगी वाहतूकदार एसटी महामंडळासह त्यांच्या जागाही गिळंकृत करतील.
- दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT