‘ॲडम स्ट्रीट’
उद्यापासून बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गेट वे ऑफ इंडिया परिसरातील ॲडम स्ट्रीट (दक्षिण वाहिनी) रोडवर ग्रेनाईट दगड बसविण्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. साेमवारपासून (ता. २०) बुधवार (ता. २९)पर्यंत ॲडम स्ट्रीट (दक्षिण वाहिनी) पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. यामुळे गेट वे परिसरात गर्दी हाेण्याची शक्यता आहे.
पर्यायी मार्ग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (दक्षिण वाहिनी)वरून येणारी वाहतूक ॲडम स्ट्रीटच्या उत्तरवाहिनीवर बॅरिकेड्स लावून दोन भाग करून सोडली जाईल. यामुळे वाहनांना अतिरिक्त वळण घ्यावे लागून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच ॲडम स्ट्रीटवरील बस क्रमांक ११६चा स्टॉप तात्पुरता छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील यॉट क्लबजवळ हलवण्यात आला आहे. तसेच टॅक्सी स्टँड महाकवी भूषण मार्ग जंक्शनजवळील भिंतीलगत स्थलांतरित करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.