मुंबई

ड्रगविक्रेत्यांना विनातिकीट प्रवेश

CD

ड्रगविक्रेत्यांना विनातिकीट प्रवेश

नेस्काे ड्रग्ज प्रकरण; सिक्युरिटी एजन्सीकडे होणार चौकशी

मुंबई, ता. १८ : गाेरेगाव येथील नेस्काे कॉन्सर्टमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन मुक्तपणे एक्स्टॅसी हे पार्टी ड्रग विकणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळीसोबत आयोजकांचे संगनमत स्पष्ट होत असल्याचा दावा वनराई पोलिसांनी शनिवारी केला. तपासादरम्यान ही टोळी विनातिकीट कॉन्सर्टमध्ये सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेस्को आणि नागपूरच्या इन्स्पायरिंग टाय कंपनीने ‘९ बाय ९ टेक्नो म्युझिक’ कॉन्सर्टचे आयोजन केले आणि सुरक्षेची जबाबदारी सेफक्युअर या सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीवर सोपवली हाेती. एजन्सीच्या एका सुरक्षा रक्षकाने अटक आरोपी विनीत गेरेवाल, आयुष साहित्य आणि त्यांच्या अन्य साथीदारांना प्रत्येकी हजार ते दोन हजार रुपये स्वीकारून विनातिकीट मुख्य प्रवेशद्वार टाळून गेट क्रमांक नऊ येथून प्रवेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

या टोळीला अवैधरीत्या प्रवेश देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा शोध सुरू आहे. आयोजकांच्याच सूचनेवरून या टोळीला आत प्रवेश देण्यात आला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्याआधारे अटकेत असलेल्या आयोजकांपैकी आकाश सामल (इन्स्पेयरिंग टाय), सनी जैन आणि बालकृष्णन कुरूप (नेस्को) यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सेफक्युअर कंपनीच्या व्यवस्थापकाकडे चौकशी केली जाणार असून त्याद्वारे ड्रग विक्रेत्या टोळीशी आयोजकांचे संगनमत तपासले जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुख्य आरोपीस पोलादपूरहून अटक
कॉन्सर्टमध्ये पार्टी ड्रग विक्री आणि अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आयुष साहित्य यास वनराई पोलिसांनी शुक्रवारी रात्री रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथून अटक केली. तो गोव्याला पसार होण्याच्या बेतात होता, असे सांगण्यात आले. कॉन्सर्टमध्ये सहभागी दक्षिण मुंबईतील एमबीए महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह इतरांच्या हाती पडलेल्या एक्स्टॅसी या पार्टी ड्रगचा मुख्य स्रोत असल्याचा आरोप आयुषवर आहे.

आरोपीच्या घरातून साठा जप्त
पोलिसांनी आरोपी आनंद पटेल आणि विनीत गेरेवाल यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली. तेव्हा उल्हासनगर येथील विनीतच्या घरातून वजनाच्या पाच एक्स्टॅसी गोळ्या सापडल्या. ३०५ ग्रॅम वजनाचा हा साठा असून त्याची किंमत २० हजार रुपये असावी, असे सांगण्यात आले. पिवळसर रंगाच्या आयताकृती गोळ्यांवर मर्सिडीजचे बोधचिन्ह कोरलेले आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT