मुंबई सेंट्रल येथे आगीत १२ दुकान गाळे खाक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई सेंट्रल परिसरातील डी. बी. मार्ग येथे शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. नवजीवन सोसायटीजवळील रिलायन्स मॉलसमोर असलेल्या सुमारे १२ दुकानांना या आगीने वेढले होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आगीची तीव्रता जास्त असल्याने दुकानांमधील इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे आणि फर्निचर खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर रविवारी पहाटे ३.५० वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले. या भीषण आगीत एकूण १२ दुकानांमधील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.