मुंबई

सामाजिक दबावामुळे वंध्यत्‍व उपचारात उशीर

CD

सामाजिक दबावामुळे वंध्यत्‍व उपचारास उशीर
अभ्यासातून वास्तव उघड; दाम्पत्यांची वाट पाहण्याची प्रवृत्ती धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : अपत्य हवे असलेल्या दाम्पत्यास भीती, लाज किंवा ‘थोडं थांबू या, सगळं ठीक होईल’, अशी मानसिकता अडसर ठरत आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यावर दवाखान्याची पायरी चढल्याने उपचारास उशीर होतो. त्याची मोठी किंमत मोजावी लागते, असे वास्तव राज्य सरकारच्या कामा अँड ऑल्ब्लेस रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या अभ्यासातून समोर आले आहे.
हा अभ्यास रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे, डॉ. अफीफा नौशाद आणि डॉ. राजश्री थाटीकोंडा यांनी सर्वेक्षणातून मांडला. तृतीय पातळीवरील शासकीय रुग्णालयातील एआरटी केंद्रात आलेल्या रुग्णांच्या अभ्यासातून एक भावनिक चित्र समोर आले आहे. या अभ्यासात समाविष्ट ६० रुग्णांपैकी तब्बल ४१.६ टक्के दाम्पत्यांनी लग्नानंतर ५ ते १० वर्षांनी उपचाराचा पर्याय निवडला. म्हणजेच समस्या समजूनही त्यांनी दीर्घकाळ वाट पाहणे पसंत केले. यामागे सामाजिक दबाव, भीती, लाज अशी मानसिकता कारणीभूत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र हीच वाट पाहणे अनेकदा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनवते.
जवळपास २८.४ टक्के दाम्‍पत्यांनी तर १० वर्षांहून अधिक काळ वंध्यत्वाचा सामना केल्यानंतरच उपचारासाठी पाऊल उचलले. अभ्यासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. सुमारे ५१.६७ टक्के रुग्णांना प्राथमिक वंध्यत्वाचा त्रास होता, म्हणजे त्यांना कधीच गर्भधारणा झाली नव्हती, तर ४८.३३ टक्के रुग्णांना दुय्यम वंध्यत्व होते. या आकडेवारीतून अनेक दाम्पत्ये सुरुवातीपासूनच अडचणींना सामोरे जात असल्याचे स्पष्ट होते.

वंध्यत्व ही लाज वाटण्याची बाब नसून, वैद्यकीय समस्या आहे. योग्य वेळी तपासणी आणि सल्ला घेतल्यास उपचार अधिक सोपे आणि परिणामकारक ठरू शकतात. उपचार करण्याचा निर्णय उशिरा घेतल्यास उपचाराची गुंतागुंत वाढते.
- डॉ. तुषार पालवे,
अधीक्षक, कामा अँड ऑल्ब्लेस रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! ६९ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात रोमांसचं खुळ शिरलं; तरुण प्रेयसीला भेटायला गेला अन्... नको तिथं फसला

Latest Marathi News Live Update: नागपूर जिल्ह्यातील कामठीतील गांधीनगर भाजी मंडीत भीषण सिलेंडर स्फोट

Maharashtra Politics: विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे इच्छुक असतील तर पाठिंबा देणारच: आमदार रोहित पवार : एसआयआरच्या सॉफ्टवेअरमुळे मतदारांना फटका!

Nagpur Gas Blast : स्वयंपाकघरातील गॅस गळतीचा स्फोट; नागपूरच्या कामठीत एकाचा मृत्यू, दहा जण जखमी

CSK चे टेन्शन आणखी वाढणार... आयुष म्हात्रे पुढचे सामने खेळणार की नाही? दुखापतीवर आले अपडेट

SCROLL FOR NEXT