कामगार रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा!
खासदार वायकर यांची मागणी
मुंबई, ता. १९ : अंधेरी येथील कामगार रुग्णालयाचे रखडलेले पुनर्निर्माण तातडीने पूर्ण करून रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
खासदार वायकर यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी रुग्णालयाची पाहणी करून अनेक त्रुटी व विलंब निदर्शनास आणले. २५४ कोटींचा प्रकल्प १५ वर्षांपासून अपूर्ण असून, आठ वेळा टेंडर बदलूनही काम पूर्ण झालेले नाही. नियमानुसार दोन मजल्यांची परवानगी असताना आठ मजले बांधल्यामुळे ओसी मिळालेले नाही. २०१८मधील आगीच्या दुर्घटनेनंतरही सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचे वायकर यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व रुग्णालय लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले तसेच तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले, अशी माहिती वायकर यांंनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.