नालेसफाई धीम्या गतीने
प्रमुख नाल्यांचे ७५ टक्के काम बाकी; मोठ्या नाल्यांची सफाई केवळ २५ टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईत पावसाळा पूर्वतयारीचा भाग असलेल्या नालेसफाईच्या कामाचा वेग यंदा कमालीचा संथ असल्याचे समोर आले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप केवळ २५.८३ टक्केच पूर्ण झाली असून अद्याप २५ टक्के नालेसफाई बाकी आहे.
पावसाळा सुरू व्हायला अवघे दीड ते दोन महिने शिल्लक असताना निम्म्याहून अधिक काम अद्याप बाकी असल्याने मुंबईकरांवर यंदाही पाणी तुंबण्याचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मिठी नदीची स्थिती अधिक बिकट
मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मिठी नदीच्या सफाईच्या बाबतीत प्रशासन अधिकच पिछाडीवर आहे. १९ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मिठी नदीचा केवळ १२.९ टक्केच गाळ उपसण्यात आला आहे. मिठी नदीच्या काही टप्प्यांत तर हे प्रमाण जेमतेम १० टक्क्यांवर रेंगाळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा वेग समाधानकारक नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पूर्व उपनगरात कामाचा वेग सर्वात कमी
विभागीय आकडेवारीवर नजर टाकल्यास पूर्व उपनगराची स्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे. शहर विभागात आतापर्यंत २९.९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पश्चिम उपनगरात २९.९१ टक्के काम पूर्ण झाले तर पूर्व उपनगरात केवळ १७.६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्व उपनगरातील काम २० टक्क्यांच्याही खाली असल्याने या भागातील सखल वस्त्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचण्याची मोठी भीती व्यक्त केली जात आहे.
काही वॉर्डांत केवळ कागदावरच सफाई
लहान नाल्यांच्या सफाईत काही वॉर्डांनी ५० टक्क्यांच्या आसपास मजल मारली असली, तरी एस वॉर्डमध्ये केवळ ३.६ टक्के आणि एम पश्चिम वॉर्डमध्ये ५.६९ टक्के काम झाले आहे. यावरून नालेसफाईच्या नियोजनात मोठ्या त्रुटी असल्याचे स्पष्ट होत आहे.
* मुख्य नाले
विभाग / काम पूर्ण (टक्के)
- शहर - २९.९२
- पश्चिम उपनगर - २९.९१
- पूर्व उपनगर - १७.६५
- एकूण (सरासरी) - २५.८३
मिठी नदी सफाई (सर्वात संथ)
टप्पा क्रमांक प्रगती (टक्के)
- पूर्व उपनगर - ५२६ / १७.७१
- पूर्व उपनगर - ५२५ / १०.८८
- पूर्व उपनगर - ५२७ / १०.०१
- एकूण सरासरी - १२.९
सफाईत सर्वाधिक पिछाडीवर असलेले वॉर्ड
एस वॉर्ड : ३.६ टक्के
- एम पश्चिम वॉर्ड : ५.६९ टक्के
- एल वॉर्ड : १४.१६ टक्के
सफाईत आघाडीवर असलेले वॉर्ड
- एच/ई : ४६.४४ टक्के
- पी/एस : ४६.२३ टक्के
- एन वॉर्ड : ४५.८८ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.