मुंबई

ड्रग्जविक्रेत्यांना प्रवेश देणारा सुरक्षारक्षक अटकेत

CD

नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरण

ड्रग्जविक्रेत्यांना प्रवेश
देणारा सुरक्षा रक्षक अटकेत
मुंबई, ता. १९ : गाेरेगावच्या ‘नेस्को’ प्रदर्शन केंद्रात झालेल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविक्रेत्यांना विनातिकीट प्रवेश देणाऱ्या सुरक्षा रक्षकाला वनराई पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. प्रदीप गुप्ता असे त्याचे नाव आहे. गुप्ताला सुट्टीकालीन दंडाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. १९) २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चाैकशीतून ड्रग्जविक्रेते आणि आयोजक यांच्यात संगनमत होते का, हे स्पष्ट होण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली आहे.

तपासादरम्यान एक्स्टॅसीच्या गोळ्या पुरवणारा प्रमुख आरोपी आयुष साहित्य आणि त्याचा साथीदार विनीत गेरेलानी यांनी आरोपी गुप्ताच्या मदतीने विनातिकीट कॉन्सर्टमध्ये प्रवेश मिळवल्याचे स्पष्ट झाले. आयोजकांनी नेमलेल्या सेफक्युअर सिक्युरिटी एजन्सीतर्फे ११ एप्रिलला नेस्को प्रदर्शन केंद्रात सुरक्षा रक्षक म्हणून गुप्ताची नियुक्ती होती. त्याने हजार ते दोन हजार रुपये घेऊन या दोघांना मुख्य प्रवेशद्वार टाळून गेट क्रमांक नऊ येथून कॉन्सर्टमध्ये प्रवेश दिल्याची माहिती पुढे आली आहे.

कॉन्सर्टमध्ये आयुष आणि विनीत यांनी एक्स्टॅसी हे पार्टी ड्रग विकल्याचे त्यांच्यातील आर्थिक व्यवहारावरून उघड झाले आहे. सुरक्षा रक्षक गुप्ता आणि ड्रग्जविक्रेते एकमेकांना आधीपासून ओळखत होते का, त्याने पैसे घेऊन स्वतःहून त्यांना आत सोडले की आयोजकांच्या सूचनेवरून त्याने ही कृती केली, याबाबत वनराई पोलिस गुप्ताकडे चौकशी करत आहेत. या प्रकरणात अटक झालेला गुप्ता दहावा आरोपी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT