मुंबई

विकसकाला अंतरिम दिलासा कायम

CD

विकसकाला अंतरिम दिलासा कायम
पुनर्विकासासंबंधी फसवणूक प्रकरण

मुंबई, ता. १९ : एका पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणात मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने मे. पूनम इन्फ्रा डेव्हलपर्सच्या भागीदार सुमीत जवाहरलाल जैन यांना अटकपूर्व जामीन कायम ठेवला.
केवळ अन्य खटले दाखल झाले आहेत म्हणून अर्जदार अटकपूर्व दिलासा मिळण्यास अपात्र ठरतो, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवून ९ मार्च २०२६ रोजी मंजूर केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन कायम ठेवला. या प्रकरणातील आरोपानुसार, जैन यांनी त्यांच्या संबंधित फर्मसह तक्रारदाराला लालबाग येथील पूनम पिनाकी प्रकल्पातील सदनिकेमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. कोणताही नोंदणीकृत करार न करता किंवा पैसे परत न करता, बँक हस्तांतरणाद्वारे ९५ लाख रुपये आणि कथित ४५ लाख रुपये रोख रकमेसह १.४० कोटी रुपये उकळण्याचा आरोप आहे.
हे प्रकरण मालमत्तेचा वाद नसून एक गंभीर आर्थिक गुन्हा आहे. जैन यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा त्यांनी गैरवापर केला, निधीचा अपहार करून अनेक सदनिका खरेदीदारांना गंडवल्याचा आरोपही तक्रारदाराने केला. अर्जदाराच्या नियंत्रणाबाहेरील आपापसातील वाद आणि कायदेशीर गुंतागुंतीमुळे हा प्रकल्प रखडला. दुसरीकडे जैन यांनी तपासात सहकार्य केले असून कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांनी सर्व अंतरिम जामिनाच्या अटींचे पालन केल्याचा युक्तिवाद त्यांच्याकडून वकील सत्यम हर्षद निंबाळकर यांनी केला.
तथापि, एफआयआर दाखल करण्यास झालेला मोठा विलंब, कथित रोख रकमेच्या देयकास समर्थन देणाऱ्या स्पष्ट पुराव्यांचा अभाव आणि प्रकल्पावर परिणाम करणारे पुनर्विकास व लवादाशी संबंधित चालू असलेले वाद लक्षात घेता, हा वाद प्रथमदर्शनी दिवाणी स्वरूपाचा असल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आणि जैन यांचा युक्तिवाद स्वीकारून अंतरिम अटकपूर्व जामीन कायम ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन

MLC Election: ठाकरे गटात फूट; खासदारांच्या बंडाची धग! अशातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT