मुंबई

कडक उन्हामुळे त्वचेच्या समस्यांत वाढ

CD

कडक उन्हामुळे त्वचेच्या समस्यांत वाढ
दररोज रुग्णांची संख्या वाढली; पाणी आणि स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : उन्हाळ्याच्या तीव्रतेने मुंबईकर हैराण झाले असून, वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. कडक उन्हामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने निर्जलीकरण, घामोळे, पुरळ, आणि बुरशीजन्य संसर्ग यांसारख्या त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी यंदाच्या उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
राजावाडी रुग्णालयाच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्वागता तांबे यांच्या मते, उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिण्याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. भरपूर पाणी पिणे, फळांचा समावेश करणे आणि योग्य झोप घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवले, तर त्वचेचा तजेला कायम राहण्यास मदत होते.
दरम्यान, जे. जे. रुग्णालयातील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. रत्नाकर कामत यांनी सांगितले की, उन्हाळ्यात आमच्या ओपीडीमध्ये दररोज ३०० ते ३५० रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे ८० रुग्ण बुरशीजन्य संसर्गाचे असतात. घामामुळे त्वचेवर ओलसरपणा वाढून संसर्गाची शक्यता अधिक वाढते, त्यामुळे शरीर कोरडे ठेवणे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात ओलावा टिकवणाऱ्या क्रीमचा नियमित वापर करणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाशात बाहेर पडताना टोपी, स्कार्फ आणि चष्माचा वापर करणे आवश्यक आहे. अतिप्रमाणात मेकअप टाळावा, कारण त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन समस्या वाढू शकतात.
उन्हाळ्यात त्वचेचे विकार टाळण्यासाठी साध्या उपायांकडे दुर्लक्ष न करता नियमित काळजी घेणे हीच निरोगी त्वचेची गुरुकिल्ली असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

आहाराकडे द्या लक्ष
सध्याच्या उष्णतेसोबत वाढते प्रदूषणही त्वचेसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आहारात व्हिटामिन ए, सी आणि ई यांचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काकडी, कोरफड यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर त्वचेला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
तसेच, दिवसातून किमान दोनदा अंघोळ करणे, स्वच्छ आणि सैल कपडे घालणे, तसेच घाम येणाऱ्या भागात योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT